Virat Kohli Retirement : ‘लोकं तुझ्या यशाबद्दल बोलतील, पण मला तुझे अश्रू…’, विराटच्या निवृत्तीनंतर अनुष्काची भावुक पोस्ट

Anushka Sharma’s Emotional Tribute to Virat Kohli’s Test Retirement : आज जगभर विराट कोहलीची चर्चा होत आहे. कारण त्याने कसोटी क्रिकेटला अलविदा करत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. ज्यामुळे बरेच क्रिकेटप्रेमी भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येकजण विराटसाठी पोस्ट शेअर करत आहे. . त्याने आधीच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती आणि आता त्याची अनुपस्थिती कसोटी सामन्यांमध्येही जाणवेल. असा विचार करून विराटचे सर्व चाहते दुःखी झाले आहेत. दरम्यान, आता विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माची पोस्ट समोर आली आहे.
अनुष्क शर्माची पती विराटसाठी भावनिक पोस्ट –
अवनीत कौरचा फोटो लाईक केल्यानंतर, अनुष्का विराटवर नाराज असल्याच्या अटकळ बांधल्या जात होत्या. दोघांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर, आता अनुष्काने एक पोस्ट शेअर करून या अफवांना फक्त पूर्णविरामट दिला नाही, तर पतीसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. अनुष्का शर्माची पोस्ट पाहून विराट कोहलीच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येईल.
मला तुझे ते अश्रू आठवतील – अनुष्क शर्मा
View this post on Instagram
अनुष्का शर्माने विराट कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो जुना आहे आणि त्यात विराट अनुष्कासोबत कसोटी क्रिकेटचे कपडे परिधान करून मैदानावर दिसत आहे. ही सुंदर आठवण शेअर करताना अनुष्काने लिहिले की, “लोकं तुझ्या रेकॉर्ड्स आणि यशाबद्दल बोलतील, पण मला तुझे ते अश्रू आठवतील जे तू कधी दाखवले नाहीस, ती झुंज आठवेल जी कुणी पाहिली नाही आणि या खेळाच्या फॉरमॅटवर तुझं ते अतूट प्रेम आठवेल. मला माहीत आहे या सगळ्याने तुझ्याकडून किती काही हिसकावून घेतलं. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर तू जरा जास्त समजूतदार आणि नम्र होऊन परतलास. तुला या सगळ्यातून प्रगती करताना पाहणं माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे.”
हेही वाचा – Virat Kohli Retirement : ‘तुझा तो भाव आजही माझ्या मनाला स्पर्श करतो…’, विराटच्या निवृत्तीवर सचिन भावुक
नेहमीच तुझ्या मनाचा आवाज ऐकलास – अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मालाही कोहलीने इतक्या लवकर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली याचं तिला आश्चर्य वाटलं. तिन पुढे लिहलं, “कुठेतरी मला नेहमी वाटायचं की तू पांढऱ्या कपड्यांमधेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करशील, पण तू नेहमीच तुझ्या मनाचा आवाज ऐकलास. म्हणून मी फक्त एवढंच म्हणेन, माझ्या प्रिय, तू या निरोपाचा प्रत्येक क्षण कमावला आहेस.” अनुष्का नेहमीच भारताच्या मॅचेसना हजर असते आणि कोहलीने अनेकदा आपली शतकं आपल्या पत्नीला समर्पित केली आहेत.
हेही वाचा – Virat Kohli retirement : विराटचा उल्लेख करत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज
विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार –
आता, ३६ वर्षीय विराट कोहली जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या भारताच्या आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार नाही. अशाप्रकारे, कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून निवृत्त झाला आहे. त्याने खेळलेल्या अर्ध्याहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. कोहलीने कर्णधार म्हणून ६८ पैकी ४० सामने जिंकले आहेत. त्याचा विजयाचा टक्का ५८.८२ आहे, जो १० किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे.





