अनुष्का सेनची अवघ्या 22 व्या वर्षी दमदार कामगिरी; कोरियन सरकारकडून खास पुरस्काराने सन्मानित

Anushka Sen| अभिनेत्री अनुष्का सेनने कमी वयात अभिनय क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. याशिवाय तिने केलेल्या दमदार कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. अनुष्का सेनला कोरिया आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कमी वयात तिने हा पुरस्कार पटकावला आहे. ऑनररी एम्बेसिडर ऑफ कोरियन टूरिजमच्या रुपात अनुष्काने कोरिया आणि भारतातील सांस्कृतिक अंतर कमी करण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे. यासाठी तिला ग्लोबल ओळख मिळाली आहे. Anushka Sen|
View this post on Instagram
याबाबत अनुष्काने पोस्ट करत लिहिले की, ‘तुम्हा सर्वांसोबत आणखी एक खास क्षण शेअर करायला मी उत्सुक आहे. कोरिया आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या माझ्या प्रयत्नांसाठी, सोल बिझनेस एजन्सी (SBA) चे सीईओ श्री ह्यून वू किम यांच्याकडून पुरस्कार मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. याबद्दल आशियाचे संचालक ली जंग-सब यांचे आभार. Kdrama मध्ये काम करण्याचे माझे स्वप्न, कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती होणे आणि आता कोरिया-भारत संबंध मजबूत करण्यात माझ्या योगदानासाठी ओळखले जाणे हे मला नक्कीच आणखी काही करण्यास प्रेरित करेल.’ Anushka Sen|
याआधी अनुष्का सेन कोरियाच्या बिलबोर्डवर झळकलेली पहिली भारतीय होती. वयाच्या केवळ २२ व्या वर्षी तिने टॅलेंट आणि मेहतनीच्या जोरावर हे यश मिळवलं. नुकतीच ती ‘दिल दोस्ती डिलेमा’ सीरिजमध्ये दिसली. आता ती आगामी ‘आशिया’ या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये झळकणार आहे.





