विराटला वाढदिवसानिमित्त अनुष्काने दिल्या खास शुभेच्छा; म्हणाली “मी तुझ्यावर नेहमी…”

Virat Kohli Birthday : भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याचा आज 35 वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराटचे चाहते त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. यातच आता विराटची पत्नी अनुष्का शर्माने देखील विराट हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काने सोशल मीडियावर विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अनुष्काने विराट कोहलीचे काही फोटो पोस्ट करत लिहिले की, “तो आयुष्यातील प्रत्येक भूमिकेत उत्कृष्ट आहे. तसेच, तो त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत नवनवीन यशाची शिखरं गाठत आहे. मी तुझ्यावर नेहमी, प्रत्येक क्षणी काहीही झाले तरी असेच प्रेम करेल.”
View this post on Instagram
विषेश म्हणजे या पोस्टमध्ये अनुष्काने 2011 सालातील एक बातमी शेअर केली आहे. यावेळी विराटने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिरो बॉलवर विकेट घेण्याचा विक्रम केला होता. विराट कोहली हा जगातील एकमेव असा गोलंदाज ठरला ज्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैध चेंडू टाकण्यापूर्वीच खेळाडूला बाद केले होते. यावर विराटनेही इमोजी कमेंट केली आहे. सध्या अनुष्काची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





