VIDEO : विदेशात शिव पार्वतीसह गणपती बाप्पाची मूर्ती पाहून भारावले अनुपम खेर म्हणाले,”आपले देवी देवता केवळ…”

मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, अनुपम खेर अशा स्टार्सपैकी एक आहेत, जे त्यांच्या चित्रपटांसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय असतात. अनुपम प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त करतात.यासाठी अनेकदा अनुपम आपल्या सोशल मीडियावरून लाईव्ह येतात तर कधी व्हिडीओ टाकून आपले म्हणणे मांडतात. नुकतच अनुपम यांनी थेट विदेशातून एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या देशाची संस्कृती किती महान आहे याबाबत परदेशात आलेला अनुभव शेअर केला आहे.
सध्या अनुपम थायलंडमध्ये आहेत. त्यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी थायलंडमधून जात असताना रस्त्यावर भगवान शिव पार्वतीसह गणपती बाप्पाची मूर्ती आढळल्याचे सांगितले आहे. एवढंच नाही तर त्या ठिकाणी थांबून अनुपम यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अनुपम खेर थायलंडच्या रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसत आहे. यादरम्यान अनुपम खेर म्हणतात, ‘मित्रांनो, आज मी तुम्हाला भारतातील देवी-देवतांचे महत्त्व, त्यांची प्रतिष्ठा आणि परंपरा सांगत आहे. मी थायलंडमध्ये आहे, बँकॉकपासून 3-4 तासांच्या अंतरावर, हायवेवर आहे असं म्हणत यावेळी ते आजूबाजूचा परिसर देखील दाखवतात.
It was an amazing feeling to see huge statutes of #ShivJiMaharaj #Parvati ji and Lord #Ganesha on the busy highway of #Thailand! God’s blessings are everywhere. Even when sometimes we cant see them with naked eyes! 🙏🕉😍 #Bholenath #OmNamahShivay #ShankarJi #Blessed pic.twitter.com/odLqwwFVwj
— Anupam Kher (@AnupamPKher) April 19, 2023
यानंतर अनुपम खेर मागे वळतात आणि म्हणतात, “भारताची परंपरा.. संस्कृती जगात किती मोठी आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी थायलंडमधील एका मुख्य रस्त्यावर आहे येथे हायवेवर शिव पार्वती आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे. ही भारताची महानता आहे.. जय शिव शंभो. आपले देवी देवता केवळ आपल्याला नाही तर संपूर्ण जगाला आशीर्वाद देतात जय शिव शंभो”



