“वडिलांच्या ट्रंकमधील खजिन्यात…” अभिनेता अनुपम खेर यांनी शेअर केल्या जुन्या आठवणी

मुंबई – बहुरंगी व्यक्तिरेखा एकाच वेळेस साकारण्यासाठी अभिनेता अनुपम खेर ओळखला जातो. अनुपम खेर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो तो नेहमी हव्या त्या गोष्टींवर व्यक्त होताना दिसतो. मग तो कधी विदेशातील टॅक्सी ड्राइव्हरसोबत संवाद साधतो तर कधी आपल्या आईसोबतचा घरातील व्हिडीओ शेअर करतो. आता देखील अनुपम खेर यांनी आपल्याच खास फोटोचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करत लिहिले- एव्हढी इच्छा तर करोडो रुपये कमवण्याची देखील होत नाही जेव्हढी इच्छा लहानपण पुन्हा मिळवण्याची होते. ‘माझ्या वडिलांच्या खजिन्यातून सापडलेला एक फोटो असं म्हणत अनुपम खेर यांनी पोस्टसोबत इनोसंट, बिट्टू असे हॅशटॅग वापरले आहेत.तरुण वयातील अनुपम खेर यांचा फोटो पाहून अनेक चाहत्यांनी तो शेअर केला आहे.
View this post on Instagram
अभिनेते अनुपम खेर यांना तीन दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत आहे. या काळात आपण त्यांना बाप, खलनायक किंवा कॉमेडी यांसारख्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पाहिलं आहे, पण आज त्यांनी शेअर केलेला फोटो पाहून खरंच त्यांना ओळखणं कठीण आहे. अनुपम यांचा भन्नाट फोटो अनेकांना आवडल्याने त्यांनी त्यावर खूप छान अशा कमेंट देखील केल्या आहेत.



