Ajit Pawar: “आम्हीही दुःखी आहोत, पण सुनेत्रा पवार यांचं दुःख डोंगराएवढं”…नाना पाटेकर भावूक
Ajit Pawar अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. अजित पवार आणि नाना पाटेकर यांच्यात अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे या घटनेने नाना पाटेकर यांनाही मोठा धक्का बसला.

Ajit Pawar: २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः पत्नी सुनेत्रा पवार यांची अवस्था अत्यंत व्यथित असल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेते नाना पाटेकर हे नुकतेच सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. अजित पवार (Ajit Pawar) आणि नाना पाटेकर यांच्यात अनेक वर्षांची घट्ट मैत्री होती. त्यामुळे या घटनेने नाना पाटेकर यांनाही मोठा धक्का बसला. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही सगळेच दुःखी आहोत. पण सुनेत्रा यांना ज्या दुःखाचा सामना करावा लागतो आहे, ते डोंगराएवढं आहे. ती वेदना पूर्णपणे कुणीही वाटून घेऊ शकत नाही. त्यांना हे दुःख स्वतःलाच सहन करावं लागेल.”
नाना पाटेकर यांनी पुढे असेही म्हटले की, अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ कुटुंबीयांनाच नव्हे तर राज्यालाही मोठी हानी झाली आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी सांभाळलेल्या जबाबदाऱ्या आता नव्याने उभ्या राहणार आहेत. सुनेत्रा पवार यांना वैयक्तिक दुःखासोबतच या जबाबदाऱ्यांचाही विचार करावा लागेल. हे सगळं सावरण्यास वेळ लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
#WATCH | Mumbai | On the demise of former Maharashtra Deputy CM Ajit Pawar, Actor Nana Patekar says,” We are saddened by it (demise of Ajit Pawar)….It all depends on the two parties (the merger of two factions of the NCP)…I knew him since he was 19-20 years old and had… pic.twitter.com/EIyWkbMMMA
— ANI (@ANI) February 12, 2026
विमान अपघाताच्या चौकशीबाबत विचारले असता नाना पाटेकर म्हणाले की, मुख्यमंत्री यांनी ब्लॅक बॉक्स सापडल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अपघाताचे खरे कारण लवकरच समोर येईल. अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, पण त्यांची उत्तरे मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पवार कुटुंब पुढे काय निर्णय घेईल, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने संबंधित कंपनीवर कारवाई केली आहे. विशेष सुरक्षा तपासणीत काही विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्यानंतर चार विमानं तात्पुरती ग्राउंड करण्यात आली आहेत. या घटनेनंतर विमान सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Ajit Pawar’s wife Sunetra
नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना सांगितले की, “मी दादांना ते १९-२० वर्षांचे असतानापासून ओळखतो. त्यांनी पक्ष कार्यकर्ते म्हणून सुरुवात केली आणि मोठ्या पदापर्यंतचा प्रवास केला. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी होता. ते माझ्यासाठी फक्त नेते नव्हते, तर लहान भावासारखे होते.”
या भावूक शब्दांतून नाना पाटेकर यांनी आपल्या जिवलग मित्राला श्रद्धांजली वाहिली. अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असले, तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.





