‘मासूम २’मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत दिसणार ‘हा’ सुप्रसिद्ध अभिनेता

Masoom 2 | ‘मासूम’ या 1983 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मोठी लोकप्रियता मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. मात्र या चित्रपटाचे स्टार कास्ट आणि शूटिंगबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. पण आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
‘मासूम 2’चे शूटिंग 2025 च्या सुरुवातीला होणार असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले आहे. यात पहिल्या भागातील कलाकारांसोबतच सिक्वलमध्ये दोन नवीन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. ‘मासूम 2’ मध्ये मूळ चित्रपटाचे अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी, त्यांच्यासोबत मनोज बाजपेयी आणि शेखर कपूर यांची मुलगी कावेरी यांचा समावेश आहे. शेखर कपूर यांनी दिल्ली येथे आयोजित 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मासूम 2’ च्या शूटिंगबद्दल माहिती दिली.
Naseeruddin Shah — Shabana Azmi — Manoj Bajpayee — Kaveri Kapur… #MrIndia and #BanditQueen director @shekharkapur announces a SEQUEL to his directorial debut #Masoom (1983)… The follow-up, #MasoomTheNewGeneration is about the idea of home, and goes on floors in MARCH 2025! pic.twitter.com/7SGJEYQp2c
— Rahul Raut (@Rahulrautwrites) November 11, 2024
शेखर कपूर ‘मासूम 2’ निमित्ताने पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमात पहिल्या भागातील नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी आणि लोकप्रिय अभिनेते मनोज वाजपेयी ‘मासूम 2’मध्ये काम करणार असल्याचे म्हंटले जात आहे. याशिवाय शेखर कपूर यांची मुलगी कावेरी सुद्धा या सिनेमात काम करणार आहे. मात्र मनोज आणि कावेरी यांची या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका असणार आहे, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’ चित्रपटात भावुक करणारी कथा दाखवण्यात आली होती. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘मासूम’ सिनेमातील गाणी आणि सिनेमाचं कथानक सर्वांच्या पसंतीस उतरले होते. त्यानंतर आता ‘मासूम 2’ 2026 ला रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
“कडवट हिंदुत्ववादीपासून मुसलमानांसमोर लाचार होईपर्यंत…” ; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका





