संजय लीला भन्साळींचे आणखी एक सरप्राइज; आगामी चित्रपटात ‘या’ कलाकारांना मिळणार संधी

Bollywood : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पद्म या चित्रपटांना मोठे यश मिळाले. भन्साळी यांच्या आगामी काही प्रोजेक्टसची चर्चा सुरु झाली आहे. त्यात त्यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘हिरामंडी’ नावाचा चित्रपटही आहे. यातच आता भन्साळी यांच्या चित्रपटात बॉलीवूडची एक जोडी पाहायला मिळणार आहे.
बॉलीवूडमधील हिट जोडी सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची भन्साळी यांच्या आगामी लव्हस्टोरीमध्ये पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, संजय लीला भन्साळी स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाहीत. त्याचे दिग्दर्शक रवी उदयवार असतील, असेही म्हंटले जात आहे.
View this post on Instagram
यापूर्वी भन्साळी यांनी विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या सोबतच्या ‘लव अँड वॉर’ या प्रोजेक्टची घोषणा केल्याचे दिसून आले आहे. तसेच हिरामंडी ही सीरिज देखील यंदाच्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
अलीकडेच संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाबद्दल जेवढे लोकांना आश्चर्य वाटले नाही तेवढेच लोकांना चित्रपटातील कलाकार पाहून आश्चर्य आणि आनंद झाला. लव्ह अँड वॉरमध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.





