Pahalgam Attack : पाकिस्तानला आणखी एक धक्का ! बगलिहार धरणाचे पाणी रोखले

Pahalgam Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी मुस्कटदाबी सुरू केली आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद केले.
आता त्यापुढे जाऊन चिनाब नदीवर असलेल्या बगलिहार प्रकल्पाचे पाणी अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पाकिस्तानसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत जम्मूतील रामबन येथील बगलिहार जलविद्युत धरण आणि उत्तर काश्मीरमधील किशनगंगा जलविद्युत धरणाद्वारे आपल्या बाजूने पाकिस्तानकडे जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन करू शकतो.
याचा अर्थ असा की, या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील बगलिहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.





