अंबानी प्रकरणात मुंबईत आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक
Updated On:

मुंबई – अंबानींच्या घरापुढे स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याच्या प्रकरणात एनआयएने आणखी एका पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. सुनील माने असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस निरीक्षक आहेत.
त्यांचा अंबानी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात हात असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना गुरुवारी एनआयए कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तेथेच त्यांना अटक करण्यात आली. या दोन्ही प्रकरणात एनआयएने या आधीच सचिन वाझे आणि रियाझ काझी या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
काल अटक करण्यात आलेले सुनील माने यांच्यावर नेमका काय आरोप आहे हे मात्र अजून जाहीर झालेले नाही. वाझे यांनी केलेल्या कटात त्यांचाही सहभाग असल्याचा संशय एनआयएने व्यक्त केला आहे.
टॅग्स:





