NCP Politics : महाराष्ट्रात आणखी एका पुतण्याने सोडली काकाची साथ, अजित पवारांचा धरला हाथ

नांदेड : नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री भाजपचे खासदार अशोक चव्हाण याना आहे. त्यांचा पुतण्या उदय चव्हाण यांनी अशोक चव्हाण यांची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांना दोन मिनिटं मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांचे समर्थकांनी देखील काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग वाढवण्यास सुरवात करत अशोक चव्हाणांना आव्हान दिले आहे.
अशोक चव्हाणांचे पुतणे उदय चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी तसेच काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शेषरावजी चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुशांत राठोड, नांदेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, नांदेडचे माजी नगरसेवक उदय चव्हाण आदी मान्यवरांसह अनेकां आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, तसंच जिल्ह्यातील विकासकामांशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
उदय चव्हाण यांची राजकीय कारकिर्द
1980 च्या दशकात उदय चव्हाण हे पैठणहून नांदेडला आले. त्यानंतर ते बराच काळ अशोक चव्हाण यांचे स्थानिक राजकारणातील सहकारी राहिले. 1990 मध्ये ते भाजपमध्ये गेले. भाजप आणि काँग्रेसकडून ते नांदेडमध्ये नगरसेवक होते.
भाजपचे माजी खासदार डी बी पाटील यांचे निकवर्टीत होते. मात्र पुढे त्यांनी अशोक चव्हाण यांना साथ दिली. काही वर्षांपूर्वी अशोक चव्हाण यांनी त्यांना धर्माबादमधील लाल बहादूर महाविद्यालयात संधी दिली. सात वर्षाच्या सेवेनंतर त्यांनी सेवानिवृ्त्ती घेतली होती. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे टाळले होते.
नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांना दोन मिनिटं मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. याचबरोबर नांदेडचे वीर सुपुत्र शहीद जवान सचिन वनंजे… pic.twitter.com/LtLnd6ubcd
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 11, 2025





