Bollywood : कपूर कुटूंबातील आणखी एका सदस्याचे बॉलीवूडमध्ये डेब्यु; चित्रपटाचे पोस्ट समोर
Bollywood : 'दादी की शादी' हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार

Bollywood : बॉलिवूडमध्ये आणखी एका कपूर कुटूंबातील सदस्याने पदार्पण केले आहे. सुपरस्टार रणबीर कपूरची मोठी बहीण रिद्धिमा कपूर साहनी वयाच्या ४५ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
विशेष म्हणजे तिच्या पहिल्याच चित्रपटात ती ‘कॉमेडी किंग’ कपिल शर्मा आणि स्वतःची आई नीतू कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
‘दादी की शादी’ या नवीन चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेत्री नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. गेल्या वर्षापासूनच या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. Bollywood
कपिल आणि नीतू कपूर यांनी २०२५ मध्ये हिमाचल प्रदेशातील शिमला येथे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. आता अधिकृतपणे चित्रपटाच्या नावाचा खुलासा करण्यात आला असून, यासोबतच चित्रपटाचे पहिले पोस्टरही चाहत्यांसोबत शेअर करण्यात आले आहे. Bollywood
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कपिल शर्मा, नीतू कपूर, रिद्धिमा कपूर साहनी आणि सादिया खतीब यांच्यासह अनेक कलाकार दिसत आहेत. चित्रपटाचे शीर्षकच अत्यंत रंजक असल्याने हा चित्रपट एका आजीच्या लग्नाभोवती फिरणाऱ्या गमतीजमतींवर आधारित असल्याचे स्पष्ट होत आहे. Bollywood
View this post on Instagram
‘दादी की शादी’ हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिद्धिमा कपूरने २००६ साली बिझनेसमन भरत साहनीसोबत लग्नगाठ बांधली होती. तिला समायरा नावाची मुलगी आहे.
तर यापूर्वी कपिल शर्माचा ‘किस किस को प्यार करूं २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, परंतु त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई करू शकला नव्हता. Bollywood
हेही वाचा:
Smartphone Tips: फोन कॉल आला की इंटरनेट बंद होतंय? या छोट्या सेटिंग्स बदलून लगेच करा प्रॉब्लेम फिक्स






