ज्येष्ठ अभिनेते, बिस्वजित चटर्जी यांना “इंडियन पर्सनॅलिटी ऑफ इयर’ पुरस्कारByप्रभात वृत्तसेवाUpdated On:January 16, 2021, 10:08 pmपणजी, दि. 16 – गोवा इथल्या 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक बिस्वजित चटर्जी यांना “इंडियन पर्सनॅलिटी ऑफ इयर’ पुरस्काराने गौरवण्यात येईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. “20 साल बाद’, “कोहरा’, “एप्रिल फूल’,”मेरे सनम’, “नाईट इन लंडन’, “दो कलियॉं’ आणि “किस्मत’ मध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांना रसिकांची मोठी पसंती मिळाली होती. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये “चौरीन्घी’ (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत “गढ नसीमपूर’, “कुहेली’ आणि त्यानंतर “श्रीमान पृथ्वीराज’ (1973), “जय बाबा तारकनाथ’ (1977) आणि “अमर गीती’ (1983) यांचा समावेश आहे. 1975 मध्ये बिस्वजीत यांनी “कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी काम केले आहे. टॅग्स:#Acting#Vishwajeet Chatterjee
Nawazuddin Siddiqui Birthday: २५०० रुपयांत मुंबईत आलेला मुलगा आज बॉलिवूडचा दमदार अभिनेता; नवाजुद्दीन सिद्दीकींचा प्रेरणादायी प्रवास