हिजबुल्लाहच्या आणखी एका कमांडरचा इस्रायलकडून खात्मा
Updated On:

जेरुसलेम : हिजबुल्लाहच्या आणखी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला हवाई हल्ल्यात ठार केले असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. नबिल कौक असे ठार करण्यात आलेल्या हिज्बुल्लाहच्या अधिकाऱ्याचे नाव असून तो हिज्बुल्लाहच्या सेंट्रल कौन्सिलचा प्रमुख होता.
आज सकाळी करण्यात आलेल्या हल्ल्यात तो ठार झाला, असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे. हिजबुल्लाहच्यावतीने यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.अलिकडच्या आठवड्यात इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लागचे अनेक वरिष्ठ कमांडर मारले गेले आहेत. यात शुक्रवारी बेरूतमध्ये गटाचा प्रमुख नेता हसन नसराल्लाह यांचा देखील समावेश आहे.





