Ajinkya Deo : ‘माझ्या नावावर आणखी एक फ्लॉप!’ माहेरची साडीबाबत अजिंक्य देव असं का म्हणाले?
Ajinkya Deo : या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना किती खोलवर जोडल्या गेल्या आहेत, याची त्यांना सुरुवातीला कल्पना नव्हती. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष आणि तिच्या भावविश्वाची जाणीव ‘माहेरची साडी’ पाहिल्यानंतर अधिक प्रकर्षाने झाल्याचे त्यांनी सांगितले.

Ajinkya Deo : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘माहेरची साडी’. अभिनेत्री अलका कुबल यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. या चित्रपटामुळे अलका कुबल यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सची रांग लागली.
विशेष म्हणजे, या चित्रपटात अभिनेता अजिंक्य देव यांनी अलका कुबल यांच्या भावाची (विकी) भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर अजिंक्य देव यांना तो फ्लॉप ठरेल, असे वाटले होते. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी यामागचा एक रंजक किस्सा सांगितला.
अजिंक्य देव यांनी सांगितले की, ते पत्नीसमवेत ‘माहेरची साडी’ पाहायला गेले होते. चित्रपट पाहून थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्नीला म्हटले, “माझ्या नावावर आणखी एक फ्लॉप चित्रपट जमा झाला.” त्यांनी केलेला दावा चुकीचा ठरला आणि चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या भावना किती खोलवर जोडल्या गेल्या आहेत, याची त्यांना सुरुवातीला कल्पना नव्हती. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष आणि तिच्या भावविश्वाची जाणीव ‘माहेरची साडी’ पाहिल्यानंतर अधिक प्रकर्षाने झाल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचे दिग्दर्शक विजू यांनी कथानकाचे नरेशन देतानाच कोणत्या प्रसंगाला महिला प्रेक्षक रडतील आणि कुठे टाळ्या वाजवतील, हे सांगितले होते. प्रत्यक्षातही तसेच घडले.
थिएटरबाहेर त्यांच्या मागे काम करणारे दिलीप पालव भावुक होऊन रडत होते. त्यांना रडण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांनी चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. त्यावेळी अजिंक्य देव यांना या चित्रपटाची खरी ताकद आणि प्रेक्षकांशी असलेले त्याचे भावनिक नाते जाणवले. ‘माहेरची साडी’च्या यशामागचे हे अनुभव आजही प्रेक्षकांसाठी खास आहेत.
Italy : युरोपात महागाईविरोधात जनक्षोभ; इटली-फ्रान्समध्ये हिंसक आंदोलने, शेकडो जणांना अटक





