आणखी एका सेलिब्रिटी किड्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण; चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर

Nadaaniyan Film | बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटी किड्स देखील पदार्पण करत आहे. यातच आता आणखी एक सेलिब्रिटी किड्स प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सोशल मीडियावर त्याच्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.
इब्राहिम अली खानच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘नादानियां’ आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यात इब्राहिम आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम यांनी केले आहे. पोस्टरमध्ये इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर दोघेही कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहेत आणि ते एका मैदानासारख्या जागेवर बसलेले दिसत आहेत. Nadaaniyan Film |
View this post on Instagram
‘नादानियां’ चित्रपटाची कथा पिया (खुशी कपूर) आणि अर्जुन (इब्राहिम अली खान) यांच्याभोवती फिरते. पिया साऊथ दिल्लीची बिनधास्त मुलगी आहे, तर अर्जुन नोएडामधील एक साधा, मध्यमवर्गीय मुलगा आहे. स्वभावाने वेगळ्या असणाऱ्या या दोघांच्या प्रेमाचा प्रवास यात पाहायला मिळणार आहे. सुनील शेट्टी, दिया मिर्झा, जुगल हंसराज आणि महिमा चौधरी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
याआधी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या शौना गौतमने चित्रपटाच्या दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. ‘नादानियां’ हा इब्राहिम अली खानचा पहिला चित्रपट असून याद्वारे तो त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर ट्रेलरची देखील अनेकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातील इब्राहिम आणि खुशीची जोडी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होणार का? हे पाहावे लागणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. मात्र अद्याप रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. Nadaaniyan Film |
हेही वाचा:
Pimpri : कामगार, महिला, सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प- खा. श्रीरंग बारणे





