उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आणखी एक धक्का; ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात

Updated On:

ठाणे – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना मुळापासून हादरून गेली आहे. सेनेचे बहुसंख्य आमदार शिंदे गटात सामील झाले असतानाच आता पक्षाचे नगरसेवक देखील ठाकरे ब्रँड सोडून जात असल्याचं दिसतंय. शिवसेनेचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेतील तब्बल ६६ नगरसेवकांनी बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपण त्यांच्यासोबत असल्याची भूमिका मांडली.

ठाण्यामध्ये शिवसेनेचे एकूण ६७ नगरसेवक असून त्यातील ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्याने आता उद्धव ठाकरेंकडे एक नगरसेवक उरला आहे. नगरसेविका नंदिनी विचारे उद्धव ठाकरेंसोबत राहिल्या आहेत. नंदिनी विचारे, शिवसेना खासदार राजन विचारेंच्या पत्नी आहेत.

एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर पक्षाचे खासदार देखील उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची  जोरदार चर्चा सुरू होती. अशातच, ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड हे पक्षातील आजवरचे सर्वात मोठे बंड आहे. सेनेला यापूर्वीही अंतगत बंडाळीची झळ पोहोचली आहे ,मात्र यावेळी थेट पक्षावरच दावा करण्यात आल्याने उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

बुधवारी (6 जुलै) शिवसेनेच्या ठाण्यातील नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर त्यांची भेट घेतली. शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना एकमताने शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.

उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यात अपयशी?

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागताच उद्धव ठाकरेंनी पक्षाला अधिक तडे जाऊ नयेत यासाठी भेटीगाठींना सुरुवात केली. मात्र उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करत असतानाच पक्षातील खासदार देखील शिंदे गटात जाणार असल्याची माहिती आहे. एकीकडे आमदार सोडून गेले, खासदार देखील त्याच मार्गावर असल्याचं बोललं जातंय. अशात आता पक्षाचे नगरसेवक देखील सोडून जात असल्याने उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यात अपयश आल्यानेच चित्र सध्या तरी दिसतंय.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

2026-10-07 22:53:07

Rahul Gandhi : 'मोर्चा रोखू शकता, पण आमची इच्छाशक्ती नाही'; सुटका झाल्यानंतर राहुल गांधींचा इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

2026-10-07 18:49:29

Rahul Gandhi : राहुल गांधींना पोलिसांनी उचलून गाडीत कोंबलं; प्रियंका गांधीही रस्त्यावर झोपल्या, काय घडलं दिल्लीत?

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

2026-10-06 16:11:16

Shiv Sena Case Hearing : शिवसेना पक्षाच्या सुनावणी दरम्यान मोठा ट्विस्ट ! सुप्रीम कोर्टाचा 'तो' एक प्रश्न; नेमकी कुणाची होणार कोंडी?

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा

2026-10-05 22:33:48

Eknath Shinde PM Modi Meeting : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर.! शिंदेंची पंतप्रधान मोदींशी तासभर चर्चा