पुण्यात आणखी 322 जण करोनाबाधित ; वाचा सविस्तर बातमी
Updated On:

पुणे- शहरात करोनाचे आणखी 322 नवे बाधित आढळून आले आहेत. तर, रविवारी दिवसभरात 288 जण करोनामुक्त झाले आहेत.
रविवारी दिवसभरात करोनामुळे आठ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यातील तीन व्यक्ती या पुण्याबाहेरील आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रविवारी दिवसभरात 2 हजार 809 जणांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. सध्या करोनाचे 388 रुग्ण गंभीर असून यातील 235 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत.
शहरात सध्यस्थितीत करोनाच्या ऍक्टिव्ह बाधितांची संख्या 5 हजार 191 इतकी आहे.





