Video | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रामुळे खळबळ

Updated On:
Video | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला भर चौकात जीवे मारण्याची धमकी, निनावी पत्रामुळे खळबळ

निमोणे(प्रतिनिधी) – शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टद्वारे हे पत्र आले आहे.

या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी पत्रात देण्यात आली आहे.

काही वर्षापूर्वीच नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भरचौकात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याने याचे तालुक्‍यातील राजकारणात तीव्र पडसाद उमटले आहेत.

लोकप्रतिनिधी बाबत जर अशी भाषा वापरली जात असेल तर लोकप्रतिनिधीनी कामे कशी करायची? असे सांगत पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, असे आमदार अशोक पवार म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Shirur News : शिरूर तालुका पुन्हा 'एकसंघ' होणार? २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग

2026-03-27 04:15:01

Shirur News : शिरूर तालुका पुन्हा 'एकसंघ' होणार? २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग

Shirur News : न्हावरे गटात भाजपाला आत्मचिंतनाची गरज! राज्यात हायकमांडकडून बळ असताना संघटना कमकुवत

2026-02-15 04:30:46

Shirur News : न्हावरे गटात भाजपाला आत्मचिंतनाची गरज! राज्यात हायकमांडकडून बळ असताना संघटना कमकुवत

Ajit Pawar : शिरूरचा 'आधारस्तंभ' कोसळला! अजितदादांच्या निधनाने प्रस्तावित प्रकल्पांचे काय होणार?

2026-01-29 04:45:04

Ajit Pawar : शिरूरचा 'आधारस्तंभ' कोसळला! अजितदादांच्या निधनाने प्रस्तावित प्रकल्पांचे काय होणार?

Sapna Chaudhary : नृत्यांगना सपना चौधरीच्या कार्यक्रम स्थळावर हल्ला; ठार मारण्याची दिली धमकी

2025-10-14 16:39:22

Sapna Chaudhary : नृत्यांगना सपना चौधरीच्या कार्यक्रम स्थळावर हल्ला; ठार मारण्याची दिली धमकी

Pune Crime: "मंत्राद्वारे तुला बकरी बनवेल" – धमकी देत मांत्रिकाकडून विधवा महिलेची 2.60 लाखांची फसवणूक

2025-07-17 22:24:23

Pune Crime: "मंत्राद्वारे तुला बकरी बनवेल" – धमकी देत मांत्रिकाकडून विधवा महिलेची 2.60 लाखांची फसवणूक