मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार

Maharashtra Budget Session 2024-2025 । आज २८ जूनला राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देत आहे. सरकार या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहे. विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पात राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे.
अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे
Maharashtra Budget Session 2024-2025 । अजित पवार यांची घोषणा
‘महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल’
Maharashtra Budget Session 2024-2025 । महत्चाच्या घोषणा
– राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
– नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील
– मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबिवली जाईल
– वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलिंडर मोफत दिले जातील
– बच्चत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल
– यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
– व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार





