ताम्हिणी घाट बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबाला पाच लाखांच्या मदतीची घोषणा
Updated On:

नागपूर – ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत सांगितले. पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
ताम्हिणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावर बसला भीषण अपघात झाला. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाले. तर, 12 ते 13 प्रवासी गंभीर जखमी झाले. चाकण इथून महाडला लग्नासाठी जात असताना आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. बसमध्ये 40 च्या आसपास प्रवासी होते.





