नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत अक्षम्य चूक; दोन व्यक्तींनी खुर्च्यांवर उड्या मारत धुराच्या मेणबत्त्या पेटवल्या

Security Breach in Lok Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्थेला बगल देत लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी उड्या मारल्या. यादरम्यान या अज्ञात दोन व्यक्तींनी धुराच्या मेणबत्त्या पेटवल्या, त्यानंतर संपूर्ण लोकसभेत धूर दिसू लागला. मात्र, नंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.
दोन आरोपींपैकी एकाचे नाव सागर आहे, तर दुसऱ्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. या लोकांनी आपल्या बुटांमध्ये लपवलेल्या धुराच्या मेणबत्त्या आणल्या होत्या. सुरक्षा कर्मचार्यांना फवारणी केलेल्या गनपावडरचा वास येत होता.
#WATCH लोकसभा की विजिटर गैलरी से एक अज्ञात व्यक्ति कूद गया जिसके बाद सदन में हंगामा हुआ और सदन को स्थगित कर दिया गया। pic.twitter.com/70ZCasi3nC
— ANI_HindiNews (@AHindinews) December 13, 2023
संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिना पुन्हा घडली घटना .
यापूर्वी 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी 22 वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राहुल गांधी आणि इतर खासदारांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली.’
या घटनेवर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे




