पिंपरी | पिंपरी न्यायालयचा वर्धापन दिन उत्साहात

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी न्यायालयचा ३५ वा वर्धापन दिन व जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध खेळांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ॲड.सचिन थोपटे होते. प्रमुख पाहुणे बार कॅान्सिल ॲाफ महाराष्ट्र आणि गोवाचे उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र उमाप व माजी नगरसेविका ॲड.उर्मिलाताई काळभोर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलनाने झाली.
या वेळी सर्व माजी अध्यक्षांचा सत्कार बारच्या वतीने करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन वकिलांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या वेळी क्रिकेट, बॅडमिंटन, बुध्दिबळस्पर्धा तसेच इतर बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यंदाचा यंग ॲडव्होकेट इस्पेर्शनल अवार्ड ॲड.नरेश शामनानी यांना देण्यात आला. सर्व महिला वकिलांना कार्यकारणीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौवरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड.प्रतिक्षा खिलारी, सचिव ॲड.धनंजय कोकणे, सहसचिव ॲड.उमेश खंदारे, महिला सचिव ॲड.मोनिका सचवाणी,
खजिनदार ॲड.अजित खराडे, ॲाडिटर ॲड.संदीप तापकिर, सदस्य ॲड. आय्याज शेख, ॲड.फारूख शेख, ॲड.दशरथ बावकर, ॲड.मिनल दर्शले, ॲड.स्वाती गायकवाड, ॲड.अस्मिता पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.गोरक्ष लोखंडे यांनी केले.





