पुणे | प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा वर्धापनदिन उत्साहात

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचा ९० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. याचा प्रारंभ संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात ब्रह्मवृंदांनी केलेल्या मंत्रजागराने झाला. या निमित्ताने संस्थेच्या शिवाजीनगर येथील सभागृहात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डॉ. प्रकाश दीक्षित, डॉ. निवेदिता एकबोटे यांची उपस्थिती होती. या निमित्ताने संस्थेच्या नियामक मंडळाचे सर्व सदस्य, संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यायाचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे तसेच डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. मनोहर सानप, डॉ. मंदार अक्कलकोटकर, डॉ. देविदास गोल्हार, सूर्यकांत गोहाड, विजय काळकर, डॉ. ए. पी. कुलकर्णी, डॉ. अशोक कांबळे, डॉ. मनोज श्रीवास्तव, डॉ. सुशील यादव, रवि शिंगणापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्था नवीन शैक्षणिक धोरणांचा अवलंब करुन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यापुढेही वाटचाल करत राहील आणि एक चांगला विद्यार्थी व चांगला नागरिक घडविण्याचा वसा तसाच पुढे नेईल. संस्थेचे हे ९० वे वर्ष असून याचे औचित्य साधून वर्षभर संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. – डॉ. गजानन एकबोटे, कार्याध्यक्ष : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी




