Anna Dange Join BJP : गोपीनाथ मुंडे ज्यांचा सल्ला घ्यायचे ‘त्याच’ नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश; स्वतः फडणवीसांनी केलं स्वागत

Anna Dange Join BJP | राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सगळीकडे ज्या भाजप पक्षाची चर्चा आहे त्या पक्षाला खऱ्या अर्थाने वाडी वस्ती तांड्यावर पोहोचविण्याचे श्रेय ज्यांना जाते त्या पहिल्या फळीतील नेते अण्णा डांगे (Anna Dange Join BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली आहे. त्यांच्या स्वागतासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अध्यक्ष रवींद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे घ्यायचे अण्णांचा सल्ला
भारतीय जनता पक्षाच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि अण्णा डांगे (Anna Dange Join BJP) यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मुंडे आणि महाजनांच्या खांद्याला खांदा लावून अण्णा डांगे यांनी महाराष्ट्रात भाजपचे काम केले. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढण्यात अण्णांचा खूप मोठे योगदान आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चात असताना अण्णा मुख्य नेते होते. युती सरकारच्या काळात ज्यावेळी गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी मुंडे आधी अण्णांशी चर्चा करायचे आणि नंतरच कॅबिनेट बैठकीला जायचे. प्री कॅबिनेट बैठकच अण्णांजवळ होत असे, असे मी पाहिले आहे. गोपीनाथरावांना मार्गदर्शन करणारा नेता आज पुन्हा पक्षात येतो आहे, मला आनंद होतोय, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
कोण आहेत अण्णा डांगे?
युती सरकारमध्ये नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळात अण्णा डांगे (Anna Dange Join BJP) यांनी ग्रामीण विकास आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले. परंतु 2002 साली पक्षातील तत्कालिन सहकाऱ्यांनी त्यांना वाईट वागणूक दिल्याने त्यांनी भाजपची साथ सोडली. यानंतर त्यांनी लोकराज्य नावाचा पक्ष स्थापन केला. पुढे जाऊन त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. धनगर समाजातील अतिशय मोठे नेते असा त्यांचा सगळीकडे लौकिक आहे. अण्णा डांगे यांच्या घरवापसीमुळे बीड जिल्ह्यात भाजपची ताकद अजून वाढणार आहे. तसेच स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.





