‘भातुकलीचा खेळ रंगतोय…’, ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताच्या प्रीवेडिंगचे सुंदर फोटो आले समोर, लवकरच अडकणार लग्नबंधनात

Ankita Prabhu Walawalkar | कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावकर ‘बिग बॉस मराठी सीझन 5’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. अंकिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती लवकरच संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे.
अंकिता सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाच्याशी संबंधित माहिती चाहत्यांशी शेअर करत असते. आता तिने प्रीवेडिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. अंकिता आणि कुणाल लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत, त्याआधी या जोडप्याने खास प्रीवेडिंग शूट केले. अंकिताने तिच्या प्रीवेडिंग शूटचा खास टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच, तिने दोघांचे काही सुंदर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या जोडप्याचे प्रीवेडिंग शूट मालवणमध्ये पार पडले. अंकिता वालावलकरने प्री वेडिंगचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्रीवेडिंग. या व्हीडिओमध्ये निसर्गरम्य कोकण आणि नारळाच्या बागा, निळाशार समुद्र पाहायला मिळत आहे. तसेच, अंकिता डोळ्याला पट्टी बांधून कुणालला पकडताना दिसत आहे.
View this post on Instagram
त्यांच्या प्रीवेडिंगचा व्हीडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या पोस्टवर भरभरून कमेंट्स केल्या जात आहेत. दरम्यान, अंकिताच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्र, ती पुढील काही महिन्यात कुणालसोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले जाते. प्रीवेडिंग व्हीडिओच्या माध्यातून लग्नाची तारीख समोर येणार का? हे जाणून घ्यायला चाहते देखील उत्सुक आहेत.





