महत्वाची बातमी ! अंकिता पाटलांची भाजपला सोडचिट्ठी ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यावर शिक्कामोर्तब?

Ankita Patil Thackeray । राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अगोदर इंदापूरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कारण भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे या देखील भाजपच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार आहेत.
युवा पदाधिकारी कार्यरत राहणार Ankita Patil Thackeray ।
दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, साहेबांनी शरद पवार पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील असेही अंकिता पाटील म्हणाल्या. भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा देणार असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या.
Ankita Patil Thackeray ।
दरम्यान , या अगोदर, हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपला सोडण्याच्या चर्चांवर महत्वाचे विधान केले होते . त्यांनी जे अगोदर ठरलं आहे तसेच होत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज हर्षवर्धन पाटील भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा
हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटील म्हणाले,’जे ठरलं होतं त्याचाच मी व्हाट्सअपला स्टेटस ठेवला..’





