Ankita Lokhande Video : प्रिंटेड साडी, मॅचिंग सनग्लासेस… ; अंकिता लोखंडेचा स्टनिंग लूक एकदा पाहाच

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ‘पवित्रा रिश्ता’ या मालिकेमुळे घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अंकिता सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
अनेक वैयक्तिक तसेच कामाबद्दलचे अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अंकिता व विकीने 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई लग्न केले आहे. ‘बिग बॉस 17’ आणि ‘लाफ्टर शेफ्स 2’ च्या माध्यमातूनही या सेलिब्रेटी जोडप्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहेत.
अंकिता लोखंडे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. विकी जैनसोबत लग्न केल्यानंतरही अंकिता पडद्यावर काम करत आहे. अभिनेत्री दररोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. अश्यातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला असून अंकिताच्या या ग्लॅमर्स लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
View this post on Instagram
नुकतंच अंकिता लोखंडे लाफ्टर शेफच्या सेटबाहेर दिसली. तिने हलक्या वजनाची प्रिंटेड साडी घातली होती आणि जुळणारे सनग्लासेस देखील घातले होते. तिचा देसी लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूपच स्टनिंग आणि बिंधास मूडमध्ये असल्याचं दिसत होत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी घेतले सात फेरे :
मुंबईतील पंचतारांकित ग्रॅंड हयातमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही तिचा बॉयफ्रेंड विकी जैन याच्याशी १४ डिसेंबर रोजी विवाहबद्ध झाली आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत दोघांनी सात फेरे घेतले.
मराठमोळ्या पद्धतीनं या विधी पार पडल्या होत्या. अंकिताने गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती. तर मराठी परंपरेनुसार अंकिता आणि विकीनं कपाळावर मुंडावळ्या बांधलेल्या होत्या.





