Ankita lokhande : अंकिताला आली बिग बॉसच्या घरात सुशांतची ‘आठवण’

Ankita lokhande – कलर्स टीव्हीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस 17’ या रिअॅलिटी शोमध्ये अंकिता लोखंडे पहिल्यांदाच सुशांत सिंग राजपूतची आठवण काढताना दिसली. बिग बॉसच्या घरातील बागेत मुनावर फारुकीसोबत गप्पा मारत असताना अंकिताने खुलासा केला की, ‘सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचे मन पूर्णपणे दुखले होते. यादरम्यान तिने सुशांतसोबतच्या शेवटच्या भेटबाबत सांगितले. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत २०१६ मध्ये वेगळे झाले.
बिग बॉस 17 च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अंकिताने सांगितले की, ‘सुशांतपासून वेगळे झाल्यानंतर तिचे मन दुखले होते आणि या घटनेमुळे तिचे आई-वडीलही खूप नाराज झाले होते. अंकिताने मुनव्वरला सांगितले की,’त्याचे जाणे ही वेगळी गोष्ट होती. माझे हृदय दु:खी झाले होते, माझे आईवडीलही दुखावले होते.”
अंकिता पुढे म्हणाली, “मी कुठेही सहभागी नव्हते, तरीही मी उभी राहिली कारण मला लोकांना ते कोण आहे हे जाणून घ्यायचे होते.” माझे ब्रेकअप झाले तेव्हा हे लोक कुठे होते? तेव्हा मी एकते होते. ब्रेकअपचे कोणतेही कारण नव्हते. एका रात्रीत माझ्या आयुष्यात गोष्टी बदलल्या. ती माझी त्याच्याशी शेवटची भेट होती, मी त्याला शेवटचे पाहिले होते. पुन्हा कधीच आम्ही भेटलो नाही. त्याने अचानक ब्रेकअपचा निर्णय घेतला त्यामुळे मलाही यातून सावरायला वेळ लागला, जेव्हा यश मिळते तेव्हा अनेक अनेक लोक मिळतात जे तुमचे कान भरतात आमच्या बाबतही असेच काहीसे झाले. ‘
सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सुशांत-अंकिता वेगळे झाले. सुशांत त्याच्या आयुष्यात पुढे गेला होता. ब्रेकअपनंतर काही वर्षांनी अंकिताने विक्की जैनला डेट करायला सुरुवात केली आणि त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये दोघांनी लग्न केले.





