\n
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये अंकिता तिच्या कुटुंबासह बिग बॉस 17 च्या सेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत आहे. तिचा उदास चेहरा पाहून लोकांचा अंदाज आहे की हरल्यानंतर ती खूप रडली.’
\nया व्हिडीओमध्ये बिग बॉस 17 चा विजेता घोषित झाल्यानंतर पापाराझी प्रत्येक बिग बॉस सदस्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढे सरसावले. यावेळी अंकिताने कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता थेट तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. इतकंच नाही तर तिच्या आईने सुद्धा प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
\nअंकिताच्या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “अंकिताची सासू खूप आनंदी दिसत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “अरे दीदी, तिच्या पालकांनी तिचा विश्वासघात केला.” असं म्हणत या व्हिडिओवरून तिला ट्रोल केले जात आहे.
\n