पुणे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील पोलीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयानुसार राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी अंकित गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते त्यापूर्वी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. याबाबतचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यमान पुणे पोलीस ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख हे अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, राज्यातील 25 पोलीस अधिक्षकपदाच्या बदल्या झाल्या असून, त्यातील 19 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे गृहविभागाकडून सांगण्यात आले आहे.