Anjeer: हृदय मजबूत राहील, त्वचेलाही येईल चमक; अंजीर खाण्याचे ६ उत्तम मार्ग

Anjeer: अंजीर हा गोड चवीचा आणि पोषणमूल्यांनी भरलेला फलप्रकार आहे. अंजीर ताजं फळ म्हणून तसेच सुकवलेल्या ड्रायफ्रूट्सच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. फायबर, पोटॅशियम, कॉपर, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन K अशा अनेक पोषक घटकांमुळे अंजीर हृदयाचं आरोग्य, पचनशक्ती आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो.
चला तर मग जाणून घेऊया अंजीर खाण्याचे ६ सोपे आणि हेल्दी मार्ग
1) अंजीर सलाड
ब्रेकफास्ट किंवा मधल्या वेळेस काही हलकं आणि आरोग्यदायी खायचं असेल, तर अंजीरचं सलाड उत्तम पर्याय आहे. काकडी, लेट्यूस, सफरचंद, अवोकाडो यांसोबत अंजीराचे तुकडे घाला. चवीनुसार लिंबाचा रस, काळी मिरी, थोडं मीठ घाला. प्रोटीनसाठी पनीर किंवा टोफू टाकू शकता.

2) अंजीर स्मूदी
घाईत असाल तर अंजीरची स्मूदी बनवा. फ्रेश किंवा रात्री भिजवलेले सुकवलेले अंजीर, एक केळं, दूध किंवा दही आणि थोडं मध मिक्सरमध्ये फिरवा. वरून नट्स घालू शकता. सकाळी स्मूदी करताना बर्फ टाळा.
3) भिजवलेला अंजीर
अंजीर खाण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे रात्री २–३ सुकवलेले अंजीर पाण्यात भिजवून ठेवणे. सकाळी उपाशीपोटी ते चावून खा. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळतं आणि पचनही सुधारतं.
:max_bytes(150000):strip_icc()/Fig-Salad-with-Blue-Cheese-and-Crispy-Prosciutto-FT-MAG-RECIPE-0824-1b9d30e4d8474842ba43d0d562bf3c21.jpg)
4) दूधात उकडलेला अंजीर
अंजीराचे छोटे तुकडे करून दूधात उकळा. यामुळे दूधाला नैसर्गिक गोडवा येतो आणि वेगळी साखर घालायची गरज राहत नाही. यातून कॅल्शियम, फायबर आणि प्रोटीन मिळतं, जे हाडं आणि स्नायूंना बळकटी देतं.
5) ओट्स किंवा दह्यात अंजीर
ब्रेकफास्टमध्ये अंजीर घ्यायचा असेल तर तो दह्यात, ओट्स किंवा दलियात छोटे तुकडे करून मिसळा. यामुळे एकाच वेळी अनेक पोषक घटक मिळतात आणि पोटही भरलेलं राहतं.

6) अंजीराचे लाडू
अंजीराचे लाडू बनवून ठेवू शकता. यात ड्रायफ्रूट्स, बिया, थोडे खजूर मिसळा. हे लाडू चविष्टही लागतात आणि पौष्टिकही असतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात.
कोणताही पदार्थ प्रमाणातच खावा. मधुमेह किंवा इतर आजार असतील तर आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.





