Jalgaon News : अंजनी नदीला महापूर; पारोळा-भडगाव मार्ग बंद, चोरवड गावात पुराचे पाणी
Jalgaon News : चोरवड गावातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अंजनी नदीला महापूर आला आहे. नदीवरील पुलावर तब्बल चार फूट पाणी आल्याने पारोळा–भडगाव मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. चोरवड गावातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अंजनी नदीच्या पुरामुळे चोरवड गावातील ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामीण दवाखाना, महादेव मंदिर आणि विठ्ठल मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
नदीवरील पुलावर सुमारे चार फूट पाणी असल्याने पारोळा–भडगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी नदीपात्र आणि पुलाजवळ जाणे टाळावे तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.





