“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे पुरावे घेऊन जात आहे”, अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीला

Anjali Damania will meet to DCM Ajit Pawar – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण तापले, संतापाची लाट उसळली. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोप झाल्याने मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सरपंच हत्या प्रकरणात सुरुवातीपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराडला लक्ष्य करत गंभीर आरोप करत आहेत. कराड मंत्री मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावरही दमानिया यांनी आरोप करत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दरम्यान, अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्यानुसार दमानिया यांना भेटण्यसाठी अजित पवारांनी बोलावले आहे. याबाबत दमानिया यांनी माहिती दिली आहे.
अजित पवारांशी बोलणं झालं.
आत्ता ७ वाजता देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे पुरावे घेऊन जात आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 27, 2025
काही वेळापूर्वी दमानिया यांनी ट्विट केले असून त्यात म्हंटले की, “अजित पवारांशी बोलणं झालं. आत्ता 7 वाजता देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे पुरावे घेऊन जात आहे.”
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे.
अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
अशा…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 27, 2025
दमानिया यांनी याआधी दुपारी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले होते की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे, बघू कधी वेळ देतात..”
दरम्यान, दमानिया यांना अजित पवारांनी भेटण्यासाठी वेळ दिली असून त्यांच्यात काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.




