“आता त्यांचा राजीनामा घ्याच…” ; दमानीयांनी दुसरा पुरावा सादर करत मुंडेंच्या राजीनाम्याची केली पुन्हा मागणी

Anjali Damania on Dhananjay Munde । बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेले ग्रहण काही केल्या संपत नाही. त्यातच विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर वाढत चालला आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी अधिक लक्ष घातल्याने त्यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यांनी आता आणखी एक पुरावा सोशल मीडियावे शेअर केला आहे. त्यानुसार त्यांचा राजीनामा घ्याच, अशी मागणी पुन्हा केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याचे दिसत आहे.
“एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो?” Anjali Damania on Dhananjay Munde ।
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी, “वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्या पुढे म्हणाल्या, “Mahagenco ही कंपनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी (wholly owned subsidiary) आहे. असे असताना एक मंत्री त्या कंपनीतून आर्थिक लाभ कसा मिळवू शकतो?” असाही थेट सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
हे Office of Profit आहे
लाभार्थी !
धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या.
वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सरव्हिसेस नावाच्या कंपनीचे मेजोरिटी शेयरहोल्डर धनंजय मुंडे व राजश्री धनंजय मुंडे आहेत. ह्यात आधी वाल्मिक कराड डायरेक्टर होते, आजही ते शेयरहोल्डर आहेत. ही कंपनी fly ash विकते ?… pic.twitter.com/Oo4Gtkvbts
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 18, 2025
अंजली दमानिया यांनी त्या कंपनीचे परिशिष्टच (Annexures) सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची सही असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. हे सर्व शेअर करत त्यांनी धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या, अशी पुन्हा मागणी केली आहे.
“धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली” Anjali Damania on Dhananjay Munde ।
दरम्यान, काल बीडमध्ये गोळीबारात दोन सख्ख्या भावाचा मृत्यू झाला त्यावर बोलताना अंजली दमानिया यांनी, “धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. याची जाणीव त्यांना झालीय म्हणून जनता दरबार वगैरे घेतायत. परंतु, धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. ज्योत मालवताना फडफडते, तसा प्रकार धनंजय मुंडे यांचा झालाय, अशी घसडकुन टीका देखील अंजली दमानिया यांनी यावेळी केला आहे.





