“शाब्बास! ५ तारखेला शपथ विधी आणि ५ तारखेला १००० कोटीची ऑर्डर?” ; अंजली दमानिया यांचे टीकास्त्र

Anjali Damania on Ajit Pawar । राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होताच मोठ्या घडामोडी होताना दिसून येत आहेत. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने अजित पवारांची जप्त केलेली संपत्ती रिलीज केली असून दिल्लीतील बेनामी ट्रिब्युनलचे याबाबतचे आदेश जारी केले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आयकर विभागाने केलेल्या कारवाईवर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यासंदर्भात अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेऊन आणखी सविस्तरपणे भाष्यही करणार आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये दमानिया यांनी म्हटले आहे की, “शाब्बास! 1000 कोटी ? भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्रिपद घ्या आणि जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात ? 5 तारखेला शपथ विधी आणि ही घ्या 1000 कोटीची ऑर्डर ? आता मला कळले की 4 तारखेला फडणवीस – शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये “मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले?, “असे दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
५ तारखेला शपथ विधी आणि ही घ्या १००० कोटीची ऑर्डर ?
ही ती ऑर्डर
आता मला कळले की ४ तारखेला फडणवीस – शिंदे आणि अजित पवारांनी जी प्रेस कांफ्रेंस घेतली त्या प्रेस मधे
“मी तर शपथ घेणार” असे अजित पवारांनी का म्हटले pic.twitter.com/s21zvcgZ2i
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 7, 2024
हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भाजपाचे आभार Anjali Damania on Ajit Pawar ।
याच प्रकरणावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अजितदादांना टोला लगावला. अजित पवार यांनी लोकशाहीच्या बळटीकरणासाठी मोठ्या कष्टाने जो लढा दिला होता, त्या लढ्याला एका अर्थाने यश प्राप्त झाले आहे. हा प्रवास यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आभार, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अजित पवारांच्या मालमत्ता जप्तीचं नेमकं प्रकरण काय? Anjali Damania on Ajit Pawar ।
अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्ता बेनामी संपत्ती कायद्याखाली जप्त करण्यात आली होती. यावरील जप्ती उठवण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाच्या निकालानुसार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्तांवरील जप्तीही उठवण्यात आली आहे. या मालमत्तांमध्ये स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्तांचा समावेश होता.





