Anjali Damania : नवा पक्ष स्थापन करणार; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची घोषणा

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकेकाळी आप सारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच पक्षाचे नाव आणि चिन्हं अशा गोष्टीचा निर्णय घेण्यात येईल असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
का काढत आहे पक्ष ?
आम्हाला विधान सभेत मिरवायची हौस नाही. पक्षात इतकी वर्षे काम करणारी लोकं या पक्षातून त्या पक्षात जात असतील, तर आम्हाला महाराष्ट्राचे राजकारण सुधारायचं आहे. आज देशाला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. आपण राजकीय पक्ष यासाठी काढत आहोत असे अंजली दमानिया म्हणाल्या.
आमचा पक्ष आदर्श असेल
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण काय आहे याचे व्हिजन आम्ही सर्व लोकांपुढे आणू , दरवेळी जातीचे कार्ड काढलं गेलं हा देश प्रगतीच्या मार्गांवर न्यायचा असेल तर रस्त्यात उतरताना आपण आधी भारतीय आहोत हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या राजकीय पक्षांना चाप बसायला हवा. त्यांना आमच्या पक्षाकडून राजकारण कसे असते हे कळेल. देशाला पुढे नेणारे तळमळीचे लोक या पक्षात असतील असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.





