Suicide । सुसाईड नोटमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची नावे लिहून नाशिकमध्ये एकाची आत्महत्या

नाशिक – नाशिक मधील भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे यांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत अशी चिठ्ठी लिहून अनिरूद्ध शिंदे यांनी आत्महत्या केल्याने त्या शहरात खळबळ उडाली आहे. मृत अनिरूद्ध शिंदे हा एका गुन्ह्यात संशयित आरोपी आहे.
भोर : स्थानिक तरुणांची तत्परता! आत्महत्या करणाऱ्या तरुणीस दिलं जीवदान
गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता.विक्रम नागरे यांच्या घरावर हल्ला केल्याच्या प्रकरणात त्याच्यावर हा गुन्हा दाखल झाला होता. भाजपचे मुकेश शहाणे आणि विक्रम नागरे यांच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून माझ्या मृत्यु प्रकरणात त्या दोघांना जबाबदार धरावे असे अनिरूद्ध शिंदे याने चिठ्ठीत लिहीले आहे.
या प्रकारामुळे संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिंदेंच्या नातेवाईकांनी घोटी पोलिस ठाण्यात काल रात्री ठिय्या दिला होता.त्यानंतर या दोघांवर शिंदे याच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.





