Aniruddhacharya : अनिरुद्धाचार्य यांची बॅालिवूडवर सडकून टीका; बिग बी अन् रणवीर सिंहला धरलं धारेवर, नेमकं काय म्हणाले?

Aniruddhacharya : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध कथावाचक अनिरुद्धाचार्य हे त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. अशातच आता त्यांनी बॅालिवूडवर सडकून टीक करत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे.
अनिरुद्धाचार्य यांनी बॉलिवूडची तुलना ब्रिटिश राजवटीसोबत केली आहे. त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड चित्रपट भारतीय संस्कृतीचा अपमान करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्यावरही टीका केली आहे.
अभिनेता रणवीर सिंहचे नाव न घेता साधला निशाणा
अभिनेता रणवीर सिंह याने न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमुळे रणवीरवर टीका करण्यात आली होती. तसेच त्याने केलेले फोटोशूट वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. या फोटोशूटवरून अनिरुद्धचार्य यांनी रणवीर सिहंला धारेवर धरलं आहे. त्याचं नाव न घेता एका सुसंस्कृत समाजात, इतका पैसा असलेला, स्टार असलेला, इतकी प्रसिद्धी असलेला माणूस नग्न फोटो काढतो, हे सुसंस्कृत समाजासाठी योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच मी ही नग्नता समाजासमोर आणली. त्याचा निषेध केला तेव्हा इतर लोक आले, असं त्यांनी सांगितलं आहे.
अनिरुद्धाचार्य यांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेल्या विधानाचा दाखल देत त्यावर भाष्य करत त्यामुळे बच्चन साहेब बालपणापासूनच त्यांच्या मुलाला चमच्याने दारू पाजत असतील, असं म्हटलं आहे. ‘जीना अगर जरुरी है तो पीना बहुत जरुरी है…’ या गाण्याचा उल्लेख त्यांनी करत वरील विधान केलं आहे.
अश्लीलता दाखविणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालण्यात यावी
अश्लीलता दाखवणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालावी, अशी मागणी अनिरुद्धचार्य यांनी केली आहे. आता तुम्ही एक गाणे ऐकले असेल… ब्लू है पानी पानी. महिलांना तिथे अर्धनग्न उभे केले आहे. लहान मुलांनी ते पाहिल्यास काय शिकवण मिळेल? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोण आहेत अनिरुद्धचार्य?





