अनिल विज यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर मनोहर लाल खट्टर म्हणाले, ‘इच्छा ठेवणे…’

Anil Vij । हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी अनिल विज यांच्या वक्तव्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे. माजी गृहमंत्री अनिल विज यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यास मुख्यमंत्रीपदासाठी आपलय नावाचा दावा करू, असे सांगितले होते. यावरून पक्षात खळबळ उडाली होती. आता याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांची प्रतिक्रिया आली आहे.
मुख्यमंत्रीपदाविषयी बोलताना मनोहर लाल खट्टर यांनी , “कुणीही दावा करू शकतो, त्यात काही आक्षेप नाही. भाजपने ठरवले आहे की पुढील मुख्यमंत्री नायबसिंग सैनी असतील.” असे म्हटले.
अनिल विज हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते Anil Vij ।
दरम्यान , 2014 च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीतही अनिल विज हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मानले जात होते. मात्र, भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मनोहर लाल खट्टर यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर 2024 च्या सुरुवातीला मनोहर लाल खट्टर यांचे मंत्रिमंडळ हटवण्यात आले, तेव्हाही अनिल विज यांना मुख्यमंत्री बनवण्याची आशा होती. मात्र, तसे झाले नाही.
नायबसिंग सैनी यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची जबाबदारी आल्याने अनिल विज संतापले. यानंतर नायबसिंग सैनी स्वतः त्यांची समजूत घालण्यासाठी गेले. मात्र, नायबसिंग सैनी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले नाही.
‘मी हरियाणाचे चित्र बदलेन’ Anil Vij ।
अंबाला कँट विधानसभेचे भाजपचे उमेदवार अनिल विज यांनी गेल्या रविवारी दावा केला होता की, हरियाणात भाजप जिंकल्यास ते मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा करतील आणि मुख्यमंत्री झाल्यास हरियाणाचे चित्र बदलेल. ते म्हणाले होते की ते सहा वेळा आमदार आहेत, त्यामुळे ज्येष्ठतेच्या आधारावर ते मुख्यमंत्रीपदासाठी दावा करणार आहेत.
हेही वाचा
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचे नाव ‘हे’ 13 लोक ठरवतील? ; समोर आली यादी, जाणून घ्या





