मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस चौकशीविरोधात राज्यभरात भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी आंदोलन करीत शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या चौकशीच्या विरोधात सध्या भाजप आक्रमक होताना दिसत आहे. त्यातच आता भाजपचे आमदार रवी राणा यांनी मोठे भाकीत वर्तवले आहे.
”अनिल परब आणि संजय राऊत नक्की जेलमध्ये जातील”, असे भाकीत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हिडीओ देखील प्रसिद्ध केला आहे. ते म्हणालेत. “उद्धव ठाकरेंना मी सांगू इच्छितो, अजून अनिल परब आणि संजय राऊत बाकी आहेत. येत्या काळात दोघेही नक्की जेलमध्ये जातील. याला कुणी थांबवू शकत नाही. दबावातून देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्यात येतेय. पण आम्ही सत्यासाठी लढू”, असं रवी राणा म्हणाले आहेत.
तसेच उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात अनेकांना दबाव टाकून गोवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आम्ही सत्यासाठी लढू आणि विजय आमचा होईल अशा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे.