satara | राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हसवड शहराध्यक्षपदी अनिल लोखंडे

म्हसवड, (प्रतिनिधी) – म्हसवड येथील दलित समाजाचे कार्यकर्ते अनिल लोखंडे यांची नुकतीच राष्ट्रीय काँग्रेसच्या म्हसवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने यांनी दिली.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश जाधव व प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या मान्यतेने लोखंडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यांची म्हसवड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. याबाबत विविध क्षेत्रातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, हरणाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह भैया देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, प्रदेश सचिव राजेंद्र शेलार अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष गब्बर काझी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले राष्ट्रीय काँग्रेसचे नेते बाबासाहेब माने, शिवाजीराव यादव, युवक आघाडीचे संदीप चव्हाण युवा आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमर कांबळे, माण-खटाव मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष डॉ. महेश गुरव, राष्ट्रीय युवा काँग्रेस कार्यकर्ते दाऊद मुल्ला यांनी त्यांचे अभिनंदन केले.





