अनिल कपूर यांनी पान मसाला जाहिरातीसाठी मिळालेली करोडोंची ऑफर नाकारली

Anil Kapoor Rejected Paan Masala Advertisement | अनेकदा काही बॉलीवूड अभिनेते पान मसाल्याची जाहिरात करताना दिसतात. यावरून त्यांना ट्रोलही केले जाते. अजय देवगण, अक्षय कुमार, शाहरुख खान यांनी यापूर्वी आरोग्यासाठी घातक असलेल्या पान मसालाची जाहिरात केली होती. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यानंतर अनिल कपूर यांना देखील पान मसाला जाहिरातीसाठी ऑफर देण्यात आली होती. परंतु ही ऑफर त्यांनी नाकारली.
चाहत्यांप्रती आणि प्रेक्षकांप्रती जबाबदारी असलेली जबाबदारी याचं भान राखत अनिल कपूर यांनी जाहिरातीची ऑफर नाकारली. तसेच कितीही पैसे मिळत असले तरी लोकांच्या आरोग्याला धोका असेल अशा कोणत्याही प्रोडक्टचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Anil Kapoor Rejected Paan Masala Advertisement |
दाक्षिणात्य कलाकारांनी आजपर्यंत कधीच असे प्रोडक्ट प्रमोट केले नाहीत. रजनीकांत, कमल हसन यांनी करिअरच्या सुरुवातीलाच अशा जाहिराती न करण्याचा निश्चय केला होता. यामुळे त्यांचे सर्वांनीच कौतुक केले होते. आता अनिल कपूर यांनी देखील या जाहिरातीला नकार दिला आहे. तर अक्षय कुमारने देखील ट्रोलिंगनंतर पान मसाल्याच्या जाहिराती न करण्याचा निर्णय घेतला. Anil Kapoor Rejected Paan Masala Advertisement |
अनिल कपूर यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, वयाच्या 67 व्या वर्षी देखील ते एकदम फिट आहे. त्यांचा लुक पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात. नुकतेच ते ‘फायटर’, ‘सावी’ आणि ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसले होते.
हेही वाचा:
“फोन आला अन् एक गाडी सोडली”; कोट्यवधींची रक्कम जप्त प्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप





