आईच्या निधनानंतर अनिल कपूर यांनी व्यक्त केले दु:ख; शेअर केली भावुक पोस्ट

Anil Kapoor | अभिनेते अनिल कपूर यांच्या आई निर्मला कपूर यांचे 2 मे रोजी निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. आईच्या निधनानंतर संपूर्ण कपूर कुटुंब अंतिम विधीसाठी एकत्र आले होते. याशिवाय बॉलीवूडचे अनेक कलाकार देखील आले होते. आईच्या निधनानंतर अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या आईचं चित्र रेखाटलेलं पेंटिग दिसत आहे. यासह त्यांनी आईबरोबरचा लहानपणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये कपूर कुटुंबाचा एकत्रित फोटोही पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
अनिल कपूर यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “आईने कायम आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं. तिने कायम स्वत:च्या आधी इतरांचा विचार केला. कायम सगळ्यांवर प्रेम केलं. स्पॉटलाईटपासून दूर असूनही कायम सगळ्यांबरोबर तिचे खूप चांगले संबंध होते,” असं म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी इंडस्ट्रीतून त्यांना या काळात मिळालेल्या आधारासाठी सर्वांचे आभार मानले आहेत.
अनिल कपूर यांच्यासह शनाया कपूर, अनशुला कपूर यांनीदेखील त्यांच्या आजीच्या आठवणी शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. निर्मला कपूर यांना बोनी कपूर, अनिल कपूर, संजय कपूर ही तीन मुलं, तर मुलगी रीना कपूर अशी एकूण चार मुलं आहेत.
हेही वाचा :
धक्कादायक…! दारूसाठी पैसे न दिल्याने घरात शिरून मारहाण; १९ वर्षीय मुलीचा मृत्यू





