पिंपरी | अनिल गायकवाड यांचा ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश

कर्जत, (वार्ताहर) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वात कर्जत-खालापूर विधानसभा क्षेत्रात सातत्याने पक्षप्रवेश होत आहेत.
शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर युवासेना विभाग अधिकारी संदेश हजारे यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हारे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य अनिल गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
गायकवाड यांसह राहुल हजारे, प्रदीप गायकवाड, आकाश जाधव, सुशांत जाधव, नैतिक गायकवाड, सुनील बोबडे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. कर्जत येथील पक्षाच्या शिवालय या मध्यवर्ती कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, संघटक बाबू घारे, युवासेना विधानसभा अधिकारी अॅड. संपत हडप, प्रथमेश मोरे, पंढरीनाथ राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या पक्ष प्रवेशाने उमरोली विभागात शिवसेनेची ताकद वाढली आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करीत असल्याचे नितीन सावंत यांनी सांगितले.





