“राष्ट्रवादीचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख, नवाब मलिकांना भेटणार”; मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत. त्याच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे. दरम्यान मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये “2019 साली परमबीर सिंह यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे,” असा उल्लेख आहे.
Save This Tweet :-
One NCP Big – Big Leader Will Meet Nawab Malik & Anil Deshmukh Soon !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
राज्यातील सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे नाव आले होते. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचे स्पष्ट केले होते. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, “या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही.”
Irrigation Scam Case Should Be Investigated Again Which Was Closed in 2019 By Param Bir Singh ! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis Ji @mieknathshinde Ji @Devendra_Office
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
तर मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. “भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटले.
I Will Be Doing Press Conference Soon And Exposing NCP BIG Leader :-
1:- List Of Assets India & Abroad
2:- Benami Companies
3:- Properties on Girl Friends Name
4:- Corruption Done As Minister in Various Portfolio
5: Family Income And Assets List !Watch The Space Now !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 16, 2022
अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे.





