Wimbledon final : संतापाच्या भरात जोकोवीचने तोडली रॅकेट

लंडन :- स्पेनच्या कार्लोस अल्कारेझविरुद्धचा पराभव सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला सहन झाला नाही. त्याने रागाच्या भरात आपली रॅकेट सेंटरबारवर आपटून तोडून टाकली. त्याने रेफ्रींशीही हस्तांदोलनही उशीरा केले. एकूणच त्याचे हे गैरवर्तन आयोजकांनी गांभार्याने घेतले असून त्याच्यावर कारवाईचेही संकेत देण्यात आले आहेत.
अवघ्या 20 वर्षांच्या अल्कारेझने जोकोवीचचा तब्बल पाच सेटपर्यंत लांबलेल्या लढतीत पराभव केला व मानाची विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली. गेल्या वर्षी त्याने अमेरिकन ओपन जिंकली होती, त्यानंतरचे त्याचे हे कारकिर्दीतील केवळ दुसरेच ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. मात्र, या सामन्याला जोकोवीचच्या गैरवर्तनाने गालबोट लागले. त्याने रॅकेट तोडली तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एका वरिष्ठ खेळाडूने केलेले हे वर्तन अनेकांच्या नापसंतीला उतरले आहे.
ब्रीटीश माध्यमांनीही त्याच्यावर प्रचंड टीका केली आहे. हे सर्व नाट्य घडल्यावर त्याने अल्कारेझ व रेफ्रींशी हस्तांदोलन करत माफीही मागितली मात्र, तरीही त्याच्यावरची टीका थांबलेली नाही.
जोकोवीचचे हे वर्तन जागतिक टेनिसला नवे नाही. त्याने अनेकदा नैराश्यातून असे वर्तन केले आहे. युएस ओपन तसेच ऑस्ट्रेलियन ओपनमध्येही त्याच्या या रागीट स्वभावाचा फटका अनेकांना बसलेला आहे.
गेल्या मोसमात त्याने व्हीसासाठी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने तसेच करोनाची लस घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळता आले नव्हते. त्यानंतरही त्याच्या वर्तनात तसूभरही फरक पडलेला नसल्याचेच रविवारी विम्बल्डनमध्ये घडलेल्या घटनेनंतर समोर येत आहे.
पुढील दशक अल्कारेझचेअल्कारेझने यंदाची विम्बल्डन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकताना आपणच येत्या काळात जागतिक टेनिसच स्टार असल्याचे सिद्ध केले. त्याचे वय व त्याच्या खेळात होत असलेली प्रगती पाहता येत्या दशकात त्याचेच नाव सातत्याने चर्चेत राहणार असे चित्रही या सामन्यातून दिसले.





