अंगणवाडी सेविका चंद्रकला कर्डीले यांचा राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान

शिरूर – सामाजिक जाणवेच्या भावनेतून अनेक जण आपले कार्य करत असतात. मात्र या कार्याचे दखल घेणे देखील गरजेचे असते. शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथील अंगणवाडी सेविका असणाऱ्या चंद्रकला कांतीलाल कर्डिले यांना ” राजमाता जिजाऊ पुरस्कारा”ने नुकतेच सन्मानित करण्यात आले. त्यांनी केलेल्या कामाची अविष्कार फाउंडेशन ने दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला आहे.
पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमा वेळी आविष्कार फाउंडेशन इंडियाचे संस्थापक संजय पवार, यशदा पुणेचे मास्टर ट्रेनर विवेक गुरव, प्रसिध्द लेखक व दिग्दर्शक सुरेश पाटोळे, कर्मविरायण चित्रपटाचे लेखक धनंजय भावलेकर, व्यवसायिक फुलचंद चाटे, अविष्कार पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रकाश चौधरी, उपाध्यक्ष प्रा. विलास आंबेकर, आविष्कार फाउंडेशन, इंडिया चे पुणे शहराध्यक्ष प्रा. श्रीकांत जगताप, सेवानिवृत्त अधिकारी साहेबराव श्रीमंदिलकर आदी यावेळी उपस्थित होते.
चंद्रकला कर्डिले या गेल्या पंधरा वर्षांपासून खंडोबाची वाडी येथे असणाऱ्या तापे मळा या ठिकाणी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात देखील त्यांचा मोठा सहभाग आहे. आरोग्य संदर्भातील उपक्रमामध्ये त्या नेहमी सहभागी असतात. चंद्रकला यांचे पती पती कांतीलाल कर्डिले हे तर्डोबावाडीच्या ग्रामपंचायतीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. सन्मानचिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





