एकच नंबर…! चक्क बांधावर जाऊन लाडकी बहीण योजनेचे भरले फ्रॉम, अंगणवाडी ताईंच्या कामाचं होतंय ‘कौतूक’

Satara । राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशात कुठल्याच महिलेला अर्ज दाखल करतांना त्रास होऊ नये म्हणून राज्य सरकारकडून विविध प्रणालींमार्फत राज्यातील पात्र व लाभार्थी महिलांचे अर्ज भरुन घेतले जात आहे. महिला भगिनींना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सध्या पाऊस पडल्यामुळे ग्रामीण भागात पेरणीला सुरुवात झाली असून गावाकडील महिला या शेतात पेरणीचे काम करत आहे. या महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठीही प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. अशात आता सोशल मीडियावर शेतात पेरणी करणाऱ्या या महिलांचा फ्रॉम भरून घेणाऱ्या एका अंगणवाडी सेविकेचा फोटो शोषलं मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देत शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविकांनी महिला भगिनींचे अर्ज भरुन घेतले. त्यामुळे, सातारा जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या पद्धतीचे सर्वत्र कौतूक आणि स्वागत होत आहे.
सोशल मीडियावर सातारा जिल्हा प्रशासनाकडून फोटोसह कॅप्शन लिहत यांची माहिती देण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की,’सातारा जिल्ह्यात घरोघरी जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्याची मोहीम सुरू आहे. पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीचे कामात व्यस्त असतात अशाच शेतात राबणाऱ्या बहिणींना या योजनेची माहिती देताना मोडकवाडी जिंती येथील अंगणवाडी सेविका’ यासह फोटोही शेअर करण्यात आला आहे. या फोटोवर लाईकचा वर्षाव होत आहे. या अंगणवाडी सेविकांचे विशेष कौतुक केले जात आहे.





