पुणे जिल्हा | अनेकान्त सोसायटीच्या कॉलेजमध्ये डी,बी.फार्म.कोर्सला मान्यता

बारामती, (प्रतिनिधी) – येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचालित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ २५ मध्ये डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म.) व बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म.) अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली (पीसीआय) या मान्यता प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर यांनी दिली.
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी गेल्या ६२ वर्षांपासून अखंडपणे ज्ञानदानाचे काम करीत असून संस्थेंतर्गत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,
अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज, अनेकान्त इंग्लिश स्कूल, जयसिंगपूर महाविद्यालय, जयसिंगपूर येथे विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेच परंतू यामध्ये कॉलेज ऑफ फार्मसीमुळे भर पडली आहे.
केजी टू पीजीपर्यंत शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी संस्थेने केली आहे. महाविद्यालय, शाळा व एमबीए मध्ये असे एकूण १२,५०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. परंतू परंपरागत शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाच्या विविध संधी संस्था कालानुरूप उपलब्ध करून देत आहे.
जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावसायीकदृष्ट्या देखील सक्षम होण्यासाठी नवनवीन पाऊले संस्था उचलत आहे अशी माहिती अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (बीएटीयू), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि तंत्र शिक्षण संचालनालय (डीटीइ), महाराष्ट्र शासनाच्या तज्ञांच्या टीमने महाविद्यालयाच्या पायाभूत सोयी सुविधा,
प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राध्यापक, आणि अभ्यासक्रमाची सखोल तपासणी केल्यानंतर मान्यता दिली असल्याचे संस्थेचे सदस्य व रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी सांगितले
अनेकान्त एज्युकेशन सोसायटीने कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली आहे.
विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण आणि अत्याधुनिक सुविधा नवीन इमारतीत उपलब्ध असून अत्याधुनिक प्रयोगशाळा, प्रगत तंत्रज्ञान व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या कोर्सच्या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीचे नवे दालन संस्थेने दिले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.दर्शन शहा यांनी दिली.
याकामी जवाहर शाह वाघोलीकर यांचे मार्गदर्शनाखाली सचिव मिलिंद शाह वाघोलीकर, विकास शहा लेंगरेकर, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.दर्शन शहा, रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी फार्मसी कॉलेजच्या उभारणीमध्ये मोलाचे योगदान दिले.
या परिषदेस संस्थेचे सन्माननीय खजिनदार सुनील शहा लेंगरेकर, विकास शहा लेंगरेकर, चंद्रगुप्त शाह वाघोलीकर, चंद्रवदन शहा मुंबईकर, विद्युत शहा, डॉ. हर्षवर्धन व्होरा, सत्यजित शहा, सोनिक शहा, डॉ.जिवराज जे.शहा, डॉ.प्रीतम व्होरा, धवल शहा, अॅड.बकुळ दोशी, इ. विश्वस्त उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मिळणार या सुविधा
-१३ लॅबोरेटरीज, ६ डिजिटल मॉडिफाय क्लासरूम्स
-प्लेसमेंट सेल, कॉम्प्युटर लॅब ,सुसज्ज ग्रंथालय
-रिडींग हॉल,विद्यार्थी व विद्यार्थीनींसाठी विश्रामिका
-सुंदर असे मॉडेल फार्मसी स्टोअर मशीन रुम असेप्टिक रूम
-स्वतंत्र परीक्षा विभाग,मेडिसिनल प्लांट गार्डन,
-विद्यार्थी ग्राहक भांडार,मुलांचे व मुलींचे वसतिगृह
-ऑडिटोरिअम, सेमिनार हॉल





